एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकUsha Nadkarni : 'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय', उषा नाडकर्णी यांचे खळबळजनक दावे
Usha Nadkarni : 'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय', उषा नाडकर्णी यांचे खळबळजनक दावे
By : जयदीप मेढे|Updated at : 22 May 2025 07:02 PM (IST)
Usha Nadkarni on Sushant Singh Rajput
Source :
ABPLIVE AIUsha Nadkarni : अभिनेता सुशांत सिंगची आत्महत्या नाही, त्याला मारलं गेलंय, असा दावा मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी केलाय. त्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या स्वभावाबाबत वर्णन देखील केलंय. उषा नाडकर्णी Usha Nadkarni) यांनी कोणते दावे केलेत जाऊन घेऊयात...
खरंच गोड पोरगा होता, या सगळ्या लोकांनी त्याची वाट लावली : उषा नाडकर्णी
उषा नाडकर्णी म्हणाल्या, जेव्हा माझी सुशांत सिंग राजपूतशी पहिली ओळख झाली तेव्हा पाहिलं होतं. छान पोरगा होता. बोलायला वगैरे खूप छान होता. नंतर थोडा त्याला साथी वेगळ्या मिळाल्यामुळे तू थोडा वेगळा झाला. वेगळा म्हणजे नेहमीतल्या वागण्यापेक्षा वेगळा झाला. तो पोरगा होता गोड... खरंच गोड पोरगा होता. या सगळ्या लोकांनी त्याची वाट लावली. मी नेहमी सांगते त्याने हँग करुन घेतलेलं नाही. मी फेसबुकवर व्हिडीओ पाहिला. त्यामुळे त्याला मारण्यासाठी जे वापरलं ते सगळं आहे. 'ज'वरुन काहीतरी त्या मुलीचं नाव आहे. मी कायम खरी एकटी असल्यामुळे बोलायला कोण नाही. मी फेसबुक पाहात असते. मला वाटतं माझे डोळे जातील फेसबुकमुळे...त्या व्हिडीओमध्ये सगळं होतं. अगदी त्याच्या गळ्याला आवळलेला बेल्ट देखील होता. त्यामुळे मी नेहमी सांगते त्याने हँग करुन घेतलं नाही, त्याला मारलंय. मी सांगते की, देव आहे. सुशांतने ज्याला मारलंय देव त्यांना शिक्षा देईल. मला पाहिजे तर गोळ्या घालू दे किंवा काही करुदे..
पुढे बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, मला पहिल्यापासून एकटं राहायला येतं. मी बिग बॉसमध्ये पोरांच्यात जाऊन बसत नव्हते. मुली सगळ्या छोट्या छोट्या होत्या. मी त्यांच्यासोबत काय गप्पा मारणार? सुरुवातीला तर मी पवित्र रिश्ता ही मालिका सोडून येणार नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी सांगितलं की, मराठी आहे. मग मी म्हटलं मराठी आहे, आपलेच लोक आहेत. मग मी गेले. बिग बॉसमधील लोक आम्ही किती मोठे शहाणे आणि आम्ही लोकांना कसं बोलतो. आम्ही कसे दीड शहाणे... मी म्हटलं तुम्ही मरा ...मी काही बोलायचेच नाही. त्यामुळे एकटीच बसायचे. घरी कोण बोलायला कोण नाही म्हणून मी फेसबुक बघते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Deepika Padukone Removed From Spirit: प्रभासच्या 'स्पिरिट'मधून दीपिकाला हटवलं? अभिनेत्रीच्या वाढत्या डिमांडला कंटाळून दिग्दर्शकांनी घेतला मोठा निर्णय
Published at : 22 May 2025 07:02 PM (IST)
Tags :
Sushant Singh Rajput Marathi Film Industry Usha Nadkarni Bollywood News ENTERTAINMENT #Marathi News
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Blog : पालकत्वाची नवी परीक्षा: मोबाईलच्या दुनियेत मुलांना सावरताना
Opinion